रशियाने युक्रेनवर 84 क्षेपणास्त्रं डागत मोठा हल्ला केला आहे. यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रशियाकडून युक्रेनवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु आहेत. रशियाकडून युक्रेनला असणारा धोका कायम आहे. मात्र आम्ही लढत राहून. मागे हटणार नाही शत्रूला तितक्याच ताकदीने उत्तर देऊ असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनवर अनेक क्षेपणास्त्रं डागल्याने युक्रेनमध्ये मोठं नुकसान झालं आहे. सध्या युक्रेनियन सरकारकडून हे नुकसान भरून काढत डागडुजीचं काम सुरु आहे, अशी माहितीही झेलेन्स्की यांनी दिली आहे.