अभिनेता रणवीर सिंग बाॅलिवूडमधील सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्यानं आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट केले. बाजीराव मस्तानी, गली बाॅय यांसारख्या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत.
मंगळवारी रणवीरला ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात आलं. हा पुरस्कार त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर त्यानं महाराष्ट्राचं कौतुक केलं. मी आज जो काही आहे… तो फक्त आणि फक्त महाराष्ट्रामुळे, असं रणवीर म्हणाला. तसेच त्यानं हा पुरस्कार बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांना समर्पित केला. बच्चन यांच्याबद्दल बोलताना तो म्हणाला, मला लहानपणापासून अमिताभ बच्चन बनायाचं होतं, आजही मला अमिताभ बच्चन बनायचं आहे आणि भविष्यातही मला त्यांच्यासारखंच बनायचं आहे. तसेच त्यानं अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, रणवीर सिंगला ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा’ पुरस्कार दोनदा मिळाला आहे. हा पुरस्कार दोनदा मिळवणारा रणवीर पहिला व्यक्ती ठरला आहे.