“संजय राऊत आज ना उद्या जेलमधून बाहेर येणारच आहेत, ते डरकाळी फोडणारच” – अनिल गोटे
सध्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना ईडीने पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. नुकत्याच झालेल्या सुनावणीत मात्र त्यांची न्यायालयीन कोठडी 17 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.
राऊतांची आठवण काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. हा माणूस आज ना उद्या जेलमधून बाहेर येणारच आहे. फडणवीस असो वा शिंदे तो एकेकाला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही, असं अनिल गोटे म्हणालेत.
शेर आखिर शेर होता है. कुठेही नेले तरी तो डरकाळी फोडणारच, असं म्हणत अनिल गोटेंनी शिंदे आणि फडणवीसांना इशारा दिलाय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
नावे काहीही द्या, लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरे गटालाच मिळणार आहे, अन् शिंदे गटाला लोकांकडून फक्त शिव्या अन् शाप मिळणार आहे. भाजपने बिचाऱ्या एकनाथ शिंदेंचं अक्षरश: खेळणं बनवलंय, अशी टीकाही त्यांनी केलीये.