शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिलं होतं परंतु या चिन्हावर आता आक्षेप नोंदवण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ‘मशाल’ वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ‘मशाल’ हे नवीन चिन्ह देण्यात आलं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना तलवार ढाल हे चिन्ह देण्यात आलं. आता आता उद्धव ठाकरे यांच्या चिन्हावर समता पार्टीकडून दावा करण्यात येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने आक्षेप नोंदवल्याने ठाकरे गटासमोर मोठे संकट येऊन ठेपले आहे. ठाकरेंची मशाल ही आमच्या पार्टीच्या चिन्हासारखीच दिसत असल्याचा दावा समता पार्टीने घेतला आहे.
मतदान यंत्रावर ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये चिन्ह असते. त्यामुळे दोन्ही चिन्ह सारखीच दिसू शकतात, असा दावा समता पार्टीने केला आहे यामुळे निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.