• शिंदे सरकारचा निर्णय
काही दिवसांपूर्वीच 44 सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. त्यातच आता शिंदे सरकारने आणखी 20 अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
या निर्णयानुसार राज्यातील महत्वाच्या शहरांमधील एकूण 20 अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात येणार आहेत. मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांची वैद्यकीय शिक्षण आयुक्तपदी, तर आस्तिककुमार पांडेय यांची औरंगाबाद जिल्दाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
सुशील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी पदावरून मुंबईतील असंघटीत कामगार डेव्हलपमेन्ट कमिशनर म्हणून बदली करण्यात आली आहे. अजय गुल्हाने यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावरून अतिरिक्त पालिका आयुक्त म्हणून नागपूरला बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात आतापर्यंत दोनदा सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यानुसार आतापर्यंत एकूण 64 अधिकाऱ्यांची बदली या सरकारच्या काळात झाली आहे.