अभिनेता अजय देवगन याचे सगळे चित्रपट सुपर हीट ठरत असतात. प्रेक्षवर्ग देखील अजयच्या चित्रपटाला पसंती देत असतात. काही दिवसांपूर्वी अजय देवगनचा ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.
रिलीज झालेल्या ट्रेलरच्या माध्यमातून अजय देवगनचा लूक समोर आला. मात्र रिलीज होण्याआधीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अजयच्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जातीये.
याचं कारण म्हणजे या चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप लावला आहे. भगवान चित्रगुप्तांचा अपमान केल्याने कायस्थ समाज्याच्या भावना दुखावल्या जात आहेत आणि म्हणून या चित्रपटावर कायस्थ समाजाने आक्षेप घेतला.
इतकंच नव्हे तर हे प्रकरण आता थेट न्यायालयात गेलं असल्याचं माध्यमांकडून समजलं. त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचा आदेश देण्यात आला आहे. येत्या 25 ऑक्टोबरला हा चित्रपट ओटीटी आणि चित्रपटगृहात रिलीज होणार होता. या चित्रपटात अजय देवगन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीत सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.