Tuesday, July 23, 2024

“आता उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेण्याची गरज नाही”

महाराष्ट्र"आता उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेण्याची गरज नाही"

शिवसेना कोणाची हा वाद मिटल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव देण्यात आलं आहे. यानंतर आता पुन्हा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

त्यातल्या त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपले अनेक आरोप- प्रत्यारोप सामनातून व्यक्त करतो. त्याला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

हातातून सत्ता गेल्यामुळे ठाकरे अस्वस्थ झाले आहेत. दिवसभरातील सगळा राग ते सामनाच्या अग्रलेखात व्यक्त करतात. त्यामुळे त्यांना सिरियसली घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केलं आहे.

याआधीही त्यांनी ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयात आलेच नाहीत. त्यामुळे कोणतं सरकार नाही, समित्या नाहीत एकट्या राष्ट्रवादीने सरकार लुटलं, असा टोला लगावला होता.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles