• भूपेश बघेल यांचे प्रत्युत्तर
छत्तीसगडमध्ये ईडीची छापेमारी सुरू आहे. त्यामुळं छत्तीसगडचं राजकीय वातावरण तापलं असतानाच छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डाॅ. रमण सिंह यांनी राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भूपेश बघेल हे सोनिया गांधींचं एटीएम असल्याचं मी वर्षभरापासून सांगतोय. हा हजारो कोटींचा घोटाळा आहे, जमा झालेला पैसा आधी आसाम आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशला पाठवला जातो. कलेक्टरला एजेंट बनवलं आहे, आज त्याच्याच घरी ईडीची छापेमारी सुरू आहे, अशा शब्दांत सिंह यांनी बघेल आणि गांधी यांच्यावर आरोप केलेयावर आता बघेल यांनी सिंह यांना प्रत्युत्तर दिलं आहे. बघेल म्हणाले, तुमचे आरोप आधी सिद्ध करा नाहीतर जाहीर माफी मागा. नाहीतर आम्ही योग्य ती कारवाई करून मानहानीचा दावा करू, असा इशाराही त्यांनी सिंह यांना दिला आहे.
दरम्यान, काॅंग्रेस संपुष्टात येण्याची वेळ आता जवळ आली आहे. त्यासाठी आम्ही देशभर लढत आहोत. काॅंगेसबद्दल जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे, असंही सिंह म्हणाले आहेत.