Thursday, September 19, 2024

“…तर मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता” – एकनाथ खडसे

maharashtra"…तर मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता" - एकनाथ खडसे

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत यायच्यावेळी साधारण दोन-तीन आमदार आपल्याकडे अधिक असते तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, असं वक्तव्य राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंनी केलंय.

आपला मित्र पक्ष मजबूत असला तर आपण ही मजबूत असू शकतो. आपल्या महाविकास आघाडी पक्षातील घटक हा मजबूत असला पाहिजे. तीन पक्ष मिळून हे सरकार येऊ शकत हे शरद पवारांनी करून दाखवलं होतं. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्यावर भर द्या, असं खडसे म्हणालेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी ने एकत्र निवडणुका लढवल्या. तर आमचा विजय निश्चित आहे. तीन पक्ष मिळून एकत्र लढावं लागेल. घोडा मैदान जवळ आलंय. त्यामुळे तयारीला लागा, असं आवाहन खडसेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

जरी महाविकास आघाडी असेल तरी आपण आपला पक्ष मजबूत केला पाहिजे.संघटन वाढवलं पाहिजे. जनसंपर्क वाढवला पाहिजे. आपले अधिकाधिक उमेदवार कसे निवडून येतील त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं ते म्हणालेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles