पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत ईडी कोठडीत होते. आता त्यांची ईडी कोठडी संपली असून ते न्यायालयीन कोठडीत जाणार आहेत. न्यायलयीन कोठडीत जाण्यापूर्वी राऊतांनी त्यांच्या आईला भावनिक पत्र लिहिलं आहे.
संजय राऊतांनी हे पत्र कोर्टाच्या बाहेरील बाकडावर बसून लिहिलं आहे, या पत्रातून त्यांनी आईला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, शिवसेनेसोबत घात करणाऱ्यांविरूद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे.
राऊतांनी पत्रात म्हटलंय की, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्राचा आणि देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. मला शिवसेनेच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही, अन्यायाविरूद्ध मी लढा देत आहे, म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावं लागलं, असंही राऊत या पत्रात म्हणाले आहेत.
या पत्रातून त्यांनी आईला असंही सांगितलं आहे की,शिवसेनेसोबत बेइमानी करण्यावर माझ्यावर दबाव होता. तसेच सरकार विरोधात बोलू नका महागात पडेल, अशा धमक्याही येत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.