दिवाळी तोंडावर आली असतानाच मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. बुधवारी कॅबिनेट बैठक पार पडल्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली.
ठाकूर यांनी सांगितल्यानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाणार आहे. 11.27 लाख कर्मचाऱ्यांना 1,832 कोटी रूपयांचा बोनस दिला जाणार आहे. याची मर्यादा 17, हजार 951 रूपये आहे. त्यामुळं रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे.
तसेच बुधवारच्या या कॅबिनेट बैठकीत अन्य काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तेल विपणन कंपन्यांना 22,000 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
दरम्यान, पूर्वोत्तर राज्यांच्या विकासासाठी PM- Devine योजनाही मंजूर करण्यात आली आहे. या योजनेची मुदत 4 वर्षांची आहे. तसेच मोदींच्या मंत्रीमंडळाने बहु राज्य सहकारी संस्था विधेयक 2022 मंजूर केलं आहे.