रिअॅलिटी शो हल्ली सगळ्यांनाच आवडतात. त्याचप्रमाणे कलर्स टिव्ही चॅनल वरील ‘झलक दिखला जा 10’ हा शो सगळ्यात लोकप्रिय आहे. या शो मध्ये अनेक स्पर्धक आणि सेलिब्रिटी आपल्या डान्सने चाहत्यांना घायाळ करत असतात.
दरम्यान या स्पर्धेत जुने सेलिब्रिटी देखील हजेरी लावत असतात. अनेक गमतीदार गोष्टीही पहायला मिळतात. जजपासून स्पर्धकांपर्यंत सर्वजण शोमध्ये मजेदार तडका टाकत असतात.
मागचा एपिसोड हा ‘कपूर स्पेशल’ होता. यामध्ये अभिनेत्री नीतू कपूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी एक छोटा गेम घेण्यात आला. ज्यामध्ये करण जोहरने नीतू यांना तैमूरबाबत प्रश्न विचारला.
करीना कपूरचा मोठा मुलगा तैमूर अली खानच्या आयाला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे देते का? तसं असेल तर मी तैमूरच्या आयाचं काम करायलाही तयार आहे. असं करण जोहरने नीतू यांंना विचारलं. यावर उत्तर देताना नीतू म्हणाल्या, त्यांनी दोन कोटी द्यावे की पाच कोटी द्यावेत. मला त्याबद्दल माहित नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.