Monday, April 22, 2024

मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार- उद्धव ठाकरे

maharashtraमी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार- उद्धव ठाकरे

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केल्यापासून शिंदे-ठाकरे वाद रोज पाहायला मिळत आहे. यातच आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

मातोश्री बंगल्यावर उरणच्या शिवसैनिकांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार असा निर्धार केला आहे. सदस्य नोंदणी करा, कागदावरची लढाई हारता कामा नये, असंही ते यावेळी शिवसैनिकांना म्हणाले.

नुकतेच ठाकरे गटाला अंधेरी पोट निवडणूकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं असून ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटाकडून मोठी तयारी सुरू आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडूनही ही निवडणूक जिंकण्यासाठी मोठी तयारी सुरू आहे. आता ही निवडणूक कोण जिंकल्याची उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles