33 वर्षे शिवसेनेचं अस्तित्व असलेलं धनुष्याबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं. त्यानंतर शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” तर ठाकरे गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” हे नाव आणि “मशाल” हे चिन्ह मिळालं.
मशाल चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते उरणवरुन मशाल घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यांशी संवाद साधला.
शिवसेना आता 56 वर्षाची झाली आहे. या वर्षात आम्ही 56 जण पाहिले. असे 56 लोक शिवसेनेत आले आणि गेले. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर आघात करायचा प्रयत्न केला त्यांच्यांमुळे शिवसेना संपली नाही. शिवसेना त्यांना गाडून पुढं गेली आणि जोमाने उभी राहिली, असा टोला शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
याचदरम्यान मशाल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नवीन चिन्ह आहे. मात्र बिहारमधील समता पक्षाने हे मशालीचं चिन्ह त्यांच्या पक्षाचं असल्याचा दावा केला आहे. अनेक वर्ष हेच चिन्ह वापरुन आम्ही निवडणूका लढवत असल्याचं पक्ष म्हणत आहे. यावर त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे