शिंदे गटाने बंड केलं आणि भाजप सोबत आपली चूल मांडली. ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता. यावेळी प्रहारचे नेते बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरु होती.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये एकाही अपक्ष आमदाराला स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. विरोधी पक्षानेही अनेकदा यावरुन टोला लगावला होता.
एकनाथ शिंदेंनी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला मंत्री करण्याचा शब्द दिला असल्याचं अनेकदा त्यांनी सांगितलं आहे. दोन्ही गटात आमचा लहानसा प्रहार आहे. आता मंत्रिपद नाही दिलं तरी अडीच वर्षानंतर मंत्रीपद मिळेल, असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना बच्चू कडूंनी केलं. यावरुन त्यांना मंत्रीपद मिळण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.