मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनेक आमदार, खासदार, नगरसेवक शिंदेंसोबत गेले. तसेच ठाकरे कुटुंबातीलही अनेक व्यक्ती शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आतापर्यंत अनेक झटके बसले आहेत. परंतु आता ठाकरेंना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
अंधेरी पोट निवडणुकीसाठी ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह मिळून ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. आता ठाकरे गटाकडून निवडणूूकीची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच या निवडणुकीसाठी आता ठाकरे गटाला ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षाने’ पाठिंबा दिला आहे.
नुकतंच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काही नेते उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर गेले हाते. या भेटीनंतर या पक्षाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मातोश्री बंगल्यावर ठाकरेंच्या भेटीवेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षातील प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, बाबा सावंत, विजय दळवी आणि बबली रावत हे उपस्थित होते.