Saturday, July 27, 2024

भारत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल – IMF

maharashtraभारत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल - IMF

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे ऑलिव्हियरयांनी भारताबाबत एक महत्वाचे विधान केले आहे त्यांच्या मते जगातील सर्वच देशांमध्ये 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता नाही. काही देशांसाठी हे उद्दिष्ट गाठणे खूप अवघड आहे, मात्र भारताकडे हे लक्ष्य गाठण्याची क्षमता आहे. दोन दिवसांपूर्वी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या वाढीचा अंदाज 60 बेसिस प्वाइंट्सने कमी केला होता. जगभरातील मंदीच्या काळात हे घडणे अपेक्षित होते. पण अंदाजात कपात करूनही IMF ने भारताचे वर्णन जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून केले आहे.IMF चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे ऑलिव्हियर गौरींचास यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक करताना, भारतामध्ये 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त केला.

IMF चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे ऑलिव्हियर गौरींचस यांनी भारतीय अर्थव्यवस्था $10 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्यासाठीचे एक गुपित सांगितले आहे. गौरींचास यांच्या मते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढवून भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते. याद्वारे भारत 10 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या जवळ पोहोचू शकतो. यासोबतच त्यांनी सल्ला दिला आहे की, भारत इमारती आणि रस्त्यांमध्ये गुंतवणूक करत आहे, मात्र मानवी संसाधनांमध्ये गुंतवणूक वाढली तर भारतही लवकर आपले ध्येय गाठेल.

पियरे ऑलिव्हियर म्हणाले की सर्वच देशांमध्ये 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता नाही. काही देशांसाठी हे उद्दिष्ट गाठणे खूप अवघड आहे, मात्र भारताकडे हे लक्ष्य गाठण्याची क्षमता आहे. तथापि, कोणत्याही देशाचे नाव न घेता ते म्हणाले की, अनेक देशांनी 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचा मार्ग झपाट्याने पार केला आहे. त्याचप्रमाणे भारत देखील हे उद्दिष्ट गाठण्यास सक्षम आहे, परंतु त्यासाठी भारताला संरचनात्मक सुधारणा करण्याची गरज आहे.

आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ यांच्या मते, भारत ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अशा परिस्थितीत भारताचा ६.८ टक्के किंवा ६.१ टक्के असणे ही मोठी गोष्ट आहे आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्याचे वातावरण पाहता भारताच्या आर्थिक विकास दराचा हा वेग हे एक चांगले लक्षण आहे. भारताच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे ३.५ ट्रिलियन डॉलर आहे. त्याच वेळी, चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे $ 12 ट्रिलियन आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये वार्षिक दरडोई उत्पन्न सुमारे 11 हजार डॉलर आहे. तर भारतातील दरडोई वार्षिक उत्पन्न सुमारे $2200 आहे. म्हणजेच चीनमधील लोक भारतीयांपेक्षा 5 पटीने श्रीमंत आहेत.

इतकेच नाही तर भारतात आर्थिक सुधारणा 1991 मध्ये सुरू झाल्या आणि तेव्हापासून भारतीयांचे उत्पन्न केवळ 5 पटीने वाढले आहे, तर या काळात चीनमधील दरडोई उत्पन्न 24 पटीने वाढले आहे. अशा परिस्थितीत जर भारत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनला तर लोकांचे जीवनमान सुधारेल.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles