नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे-शिंदे गटाला नवीन नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यानुसार ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं असून ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर शिंदे गटाला ‘ढाल- तलावर’ चिन्ह मिळालं असून ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. या पत्रात एकूण 12 मुद्दे आहेत. ठाकरे गटाला सापत्न वागणूक देऊन निवडणूक आयोगाने ठाकरे गटासोबत भेदभाव केल्याचं या पत्रात ठाकरे गटानं म्हटलं आहे.
आता ठाकरे गटाच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच आता निवडणूक आयोग या पत्रावर काय स्पष्टीकरण देईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शिंदेंच्या बंडानंतर अंधेरी पोटनिवडणूक महत्वाची मानली जात आहे. कारण या निवडणुकीतून जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट होऊ शकते.