शिवसेनेचे पुर्वाश्रमीचे नेते आणि सध्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अमृत महोत्सव साजरा करण्यात आला आहे. हा सोहळा मुंबईत पार पडला.
यावेळी अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना अनेकांनी भुजबळांचं तोंडभरुन कौतुक केलं. यातच शिवसेना नेते उद्धव ठाकरें यांनी भुजबळांविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे. जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत असताना ते म्हणाले 1999 च्या निवडणुकीत जर अजून चार महिने वेळ मिळाला असता तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वाधिक जागा निवडून आल्या असत्या आणि छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते.
यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले अजित दादा तुमच्या मुख्यमंत्र्याचं तुम्ही सांगितलं मात्र छगन भुजबळ जर शिवसेनेत असते तर त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते.