Thursday, September 19, 2024

“ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल तेव्हा…”

maharashtra"ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल तेव्हा..."

भाजपची आजपर्यंतची निती आणि वर्तवणूक पाहता शिंदे गटाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपशीच संघर्ष करावा लागणार असल्याचं शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले होते. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलीये. ते चिपळूणमध्ये बोलत होते.

ज्यावेळी भाजप आमचा वापर करत आहे किंवा आमच्याकडून काही करून घेते आहे, असं आम्हाला वाटेल त्यावेळी त्यांना उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे, असं सामंत म्हणालेत.

देशात सर्वात मोठा घोटाळा तेलगी स्टॅम्पचा झाला होता. त्यानंतरचा मोठा घोटाळा आता झाला आहे, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जवळपास शंभर कोटींचे स्टॅम्प खरेदी केले असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळेच त्याचा तपास होणं गरजेचं असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles