मुंबई उच्च न्यायालयाने ऋतुजा लटके प्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. शक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या, असा आदेश न्यायलयाने महापालिकेला दिला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाचा दिलासा मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुष्मा अंधारे म्हणाल्या की, भारतीय संविधानाची एक चौकट आहे. एका विभागाने दुसऱ्या विभागात हस्तक्षेप करायचा नसतो. परंतु मुंबई महापालिका आपलं हसू करून घेत आहे. दसरा मेळाव्यालाही ठाकरेंना मैदान मिळू नये, यासाठी महापालिकेने प्रयत्न केले. एवढीच राजकारणाची आवड असेल तर त्यांनी राजकीय पक्षात येऊन राजकारण करावं, असा टोला त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना लगावला आहे.
तसेच शिवसेनेकडे प्लॅन बी नसतो, आम्ही थेट भिडणारे लोक आहोत, त्यामुळं आम्ही धुमधडाक्यात लटके यांचा फाॅर्म भरू, असंही सुष्मा अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, आता अंधेरी पोट निवडणुकीकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.