आपल्या देशातील अर्थव्यवस्था बँकांवर अबलंबून असते. त्याचबाबतीत आता देशात खासगीकरणाच्याबाबतीत वेगाने काम सुरु आहे. याचसंबधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
देशाच्या बँकिंग प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार अनेक बदल करत आहे. यासाठी आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणासाठी मार्चपर्यंत निविदा मागवल्या जातील. त्यानुसार सरकार आणि LIC, IDBI बँकेतील सुमारे 60.72 टक्के हिस्सा विकत आहेत. त्यांच्याकडे बँकेचा 94.72 टक्के हिस्सा आहे.
या बँकांसाठी बोली देखील लावण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामलागू ग्रुप आयडीबीआय बँकेसाठी बोली लावणार आहे. श्रीराम लागू ग्रुप आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणासाठी स्वतंत्र होर्डिंग कंपनीची स्थापना करु शकतो.
श्रीराम समूह ही सध्या एक व्यावसायिक वाहन वित्तपुरवठा, दुचाकी वित्तपुरवठा तसेच लहान आणि मध्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करते. आयडीबीआयचे दोन टप्प्यात खासगीकरण करण्यात येणार आहे. प्रथम ईओआय सादर केले जातील आणि त्यानंतर खासगीकरण प्रक्रिया होईल.