Saturday, July 27, 2024

जागतिक भूक निर्देशांकात पाकिस्तान, बांगलादेश या देशांच्या मागे भारत, देशातील परिस्थिती चिंताजनक

दुनियाजागतिक भूक निर्देशांकात पाकिस्तान, बांगलादेश या देशांच्या मागे भारत, देशातील परिस्थिती चिंताजनक

भूकबळीवर जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स रँकिंग मध्ये भारत या वर्षी 6 स्थानांनी घसरून 107 व्या स्थानावर आला आहे.या रिपोर्ट मध्ये भारताचे शेजारी देश पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ यांची स्थिती भारतापेक्षा चांगली आहे. सन 2022 चा ग्लोबल हंगर इंडेक्सचा अहवाल जाहीर झाला असून, यातील आकडेवारीमुळे भारताची चिंता वाढली आहे. भारताची गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 स्थानांनी घसरण झाली असून तो १०७व्या स्थानी फेकला गेला आहे. दक्षिण आशियातील भारताची क्रमवारी फक्त अफगाणिस्तान या देशापेक्षा सरस आहे. बाकी भारताचे शेजारी देश भारतापेक्षा वरच्या क्रमांकावर असून, त्यात पाकिस्तान 99व्या, श्रीलंका 64व्या तर नेपाळ 81व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर बांगलादेशही या यादीत भारताच्या पुढे 84 व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 100 पॉइंट्सच्या आधारे काढला जातो, जो भुकेची तीव्रता दर्शवतो. त्याचा भारताचा स्कोअर 29.1 आहे, जो गंभीर या श्रेणीत मोडतो. जागतिक भूक निर्देशांकात भारताच्या खाली झांबिया, अफगाणिस्तान, तिमोर-लेस्टे, गिनी-बिसाऊ, सिएरा लिओन, लेसोथो, लायबेरिया, नायजर, हैती, चाड, डेमसह इतर अनेक देश आहेत. यासह, गिनी, मोझांबिक, युगांडा, झिम्बाब्वे, बुरुंडी, सोमालिया, दक्षिण सुदान आणि सीरियासह इतर अनेक देशांची श्रेणी त्या देशातील वाईट परिस्थिती मुळे निश्चित केली जाऊ शकत नाही. भारतातील बालमृत्यू दरात किरकोळ सुधारणा झाली आहे. 2014 ते 2022 या कालावधीत बालमृत्यू दरही 4.6% वरून 3.3% वर आला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सचा अहवाल तयार करण्यासाठी जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भुकेचे निरीक्षण केले जाते. यासोबतच जागतिक भूक निर्देशांक हा 100 गुणांच्या आधारे काढला जातो, जो कुपोषण, मुलांची खुंटलेली वाढ, अर्भकांमधील कुपोषण आणि बालमृत्यूच्या आधारावर निर्धारित केला जातो.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles