Tuesday, July 23, 2024

दिवाळीनिमित्त पश्चिम रेल्वेवर 30 अतिरिक्त विशेष गाड्या

देशदिवाळीनिमित्त पश्चिम रेल्वेवर 30 अतिरिक्त विशेष गाड्या

दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरगावी जाणा-या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे 30 उत्सव विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

वांद्रे टर्मिनस- गांधीधाम सुपरफास्ट स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी सायंकाळी 7:25 वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी सकाळी 8:40 वाजता गांधीधामला पोहोचेल. ही ट्रेन 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.
तसेच, गांधीधाम- वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल ही ट्रेन गांधीधामहून दर गुरुवारी रात्री 12:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2:20 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. वांद्रे टर्मिनस- भावनगर स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर शुक्रवारी सकाळी 9:15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भावगरला रात्री 11: 45 वाजता पोहोचले. ही गाडी 21 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.

भावनगर – वांद्रे टर्मिनस स्पेशल भावनगरहून दर गुरवारी दुपारी 2: 50 वाजता सुटेल आणि वांद्रे टर्मिनसला दुस-या दिवशी सकाळी सहा वाजता पोहोचले. ही गाडी 20 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत धावेल. या दोन्ही गाड्यांच्या दहा फे-या असणार आहेत. वांद्रे टर्मिनस- भगत की कोठी स्पेशल वांद्रे टर्मिनसवरुन दर शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल. ही गाडी 22 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर 2022 रोजी धावेल.
त्याचप्रमाणे भगत की कोठी वांद्रे टर्मिनस स्पेशल प्रत्येक रविवारी भगत की कोठी येथून दुपारी 12:15 वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी सकाळी 11:45 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल आणि वडोदरा – हरिद्वार सुपरफास्ट स्पेशल ही गाडी 22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles