Wednesday, October 30, 2024

केदारनाथमध्ये हेलिकाॅप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू

देशकेदारनाथमध्ये हेलिकाॅप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू

केदारनाथमध्ये हेलिकाॅप्टर कोसळले. यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.उत्तराखंडमधील केदारनाथपासून 2 किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टी येथे हेलिकाॅप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी हेलिकाॅप्टरमध्ये 7 जण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. हे हेलिकाॅप्टर एका खासगी कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकाॅप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकाॅप्टर केदारनाथहून परतत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो केदारनाथ धामचा जुना मार्ग होता. अपघाताच्या वेळी हेलिकाॅप्टरमध्ये सहा जण होते.

मदत आणि बचावकार्यासाठी पथके रवाना झाली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकाॅप्टर कोसळले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles