Saturday, July 27, 2024

पाच वर्षांत केंद्राने महाराष्ट्राला दिले 223 प्रकल्प; परंतु राज्याची कामगिरी निराशाजनक

maharashtraपाच वर्षांत केंद्राने महाराष्ट्राला दिले 223 प्रकल्प; परंतु राज्याची कामगिरी निराशाजनक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राला केंद्राकडून सर्वाधिक प्रकल्प दिले. यापैकी प्रत्येक प्रकल्प 150 कोटी आणि त्याहून अधिक 2 लाख कोटींचा आहे, परंतु ते वेळेत पूर्ण करण्याच्या बाबतीत राज्याची कामगिरी निराशाजनक आहे. त्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढल्याचे दिसत आहे.

यापैकी ब-याच प्रकल्पांना अनेक महिन्यांचा वेळ गेला आणि विलंबामुळे खर्चात 25 हजार कोटींची वाढ झाली. पंतप्रधान कामाच्या प्रगतीचे वैयक्तिकरीत्या निरीक्षण करत आहेत. हे प्रकल्प 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. या 223 प्रकल्पांसाठी निधीच्या बाबतीतही महाराष्ट्राचा वाटा सिंहाचा होता. 1 हजार 579 प्रकल्पांची एकूण किंमत 21.95 लाख कोटी निश्चित करण्यात आली आणि महाराष्ट्राला 2 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली.

मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, महाराष्ट्रात खर्च आणि वेळेत वाढ होण्याचे एक कारण म्हणजे केंद्र सरकार आणि तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार यांच्यात तीन वर्षांपासून सतत झालेला संघर्ष हे आहे. यामुळे अनेक निर्णय घेण्यात खूप वेळही गेला.
महाराष्ट्रात सध्या शिंदे- फडणवीस यांचे सरकार आल्याने या प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. यात पंतप्रधानांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही समावेश आहे. हा प्रकल्प आता जलदगतीने मार्गी लागू शकतो. नव्या सरकारने त्या दिशेने पाठपुरावाही सुरु केला आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles