Tuesday, July 23, 2024

नाटो सीमेजवळ रशियाने तैनात केले 11 बॉम्बर्स; अणूयुद्ध होणार?

दुनियानाटो सीमेजवळ रशियाने तैनात केले 11 बॉम्बर्स; अणूयुद्ध होणार?

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची व्याप्ती वाढत आहे. क्रिमीया पुलावरील हल्ल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळत आहे. आण्विक युद्धाची धमकी दिल्यानंतर रशियाने आता नाटो देशांच्या सीमेपासून अवघ्या 20 मैल अंतरावर अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम 11 बाॅम्बर्स तैनात केली आहेत.

पाश्चात्य देशांनी इशारा देण्यासाठी रशियन अध्यक्ष पुतीन सीमेवर बाॅम्बवर्षावर करु शकतात. कारण, क्रिमिया पुलावरील हल्ल्यानंतर पुतीन यांनी या हल्ल्याची युक्रेनला जबर किंमत मोजावी लागेल, असा अनेक वेळा इशारा दिला.

रशियाला रोखण्यासाठी अमेरिका 723 दशलक्ष डाॅलरची आणखी शस्त्रे आणि युद्धसामग्री पाठवणार आहे. यामध्ये हिमारस मोबाईल राॅकेटचाही समावेश असणार आहे. मदतीमध्ये युद्धसामग्री, वाहने आणि वैद्यकीय साहित्याचाही समावेश असेल, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. युक्रेनला पुरवठा सुरळीत ठेवणे हे मदतीचे उद्धिष्ट आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles