Saturday, July 27, 2024

भारतीयांचा चीनला झटका; 40 टक्के लायटिंग ‘स्वदेशी’

दुनियाभारतीयांचा चीनला झटका; 40 टक्के लायटिंग ‘स्वदेशी’

दिवाळी तोंडावर आलेली असल्यामुळे देशातील लायटिंग मार्केट सजले आहे. 1 हजार कोटी रुपयांच्या या बाजारावर अनेक वर्षांपासून चीनचा जवळपास 100 टक्के ताबा होता. मात्र, चीनच्या मक्तेदारीला काही मोठ्या प्रमाणात मोडण्यात यश आले आहे. गलवान संघर्षानंतर ग्राहकांनी मेड इन इंडिया लायटिंगला पसंती दिली. त्यामुळे आता 30 ते 40 टक्के स्वदेशी लायचटिंगची विक्री होत आहे.

यंदा डिझायनर लायटिंगची मागणी अधिक आहे. दिवाळीत जाॅय लायटिंगचा व्यवसाय 80 ते 100 कोटी रुपयांचा होतो. यंदा स्वदेशी कंपन्यांनी दिवे, गणपती, स्वस्तिक इत्यादी डिझाइन बाजारात आणले आहेत. 50 हजार डीलर्स या व्यवसायात आहेत.

यंदा रंग बदलणारी व डीम होणारी लायटिंग तर बाजारात आहेच, पण रिमोट कंट्रोल तसेच मोबाईल व लॅपटाॅपवरुन नियंत्रित होणारी लायटिंगही आहे. मागच्या 5 वर्षांपासून वीज वाचवणारी लायटिंग उपलब्ध आहेत. त्यामुळे विजेचा वापरही कमी होतो.

इलेक्ट्रिक लॅम्प अॅंड कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, देशात एलईडीचा व्यवसाय 23 हजार कोटी रुपयांचा आहे. त्यात कंझ्युमर लायटिंगची हिस्सेदारी 60 टक्के आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles