Monday, June 24, 2024

“ओ भास्करशेठ माझ्या नादी लागू नका…”

maharashtra“ओ भास्करशेठ माझ्या नादी लागू नका…”

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी एका कार्यक्रमात बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांची नक्कल केली होती. याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली आहे.

संजय राठोड यांना लक्ष्य करताना जाधव यांनी चित्रा वाघ सध्या कुठे आहेत? असा खोचक प्रश्न विचारला. त्या मुलीचा ज्या पद्धतीनं छळ झाला, ज्या पद्धतीनं तिनं आत्महत्या केली, त्या आत्महत्येच्या पाठीमागे संजय राठोडच आहेत अशापद्धतीने भाजपाने महाराष्ट्रात आरोपाची राळ उठवली, असं जाधव यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरुन पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदांचा उल्लेख करत नक्कल केली.

ओ, भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही नाच्या’चं चांगल काम करता, तेच करा. माझ्या नादी लागू नका. जेव्हा पूजा चव्हाणसाठी मी लढत होती तेव्हा बिळात घुसला होतात की तोंडाला लकवा मारला होता?, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केलाय.

तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नव्हे तर आम्ही आमच्या जीवावर लढतो..याद राखा, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी भास्कर जाधव यांना सुनावलं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles