दिवाळीत नवनवीन गोष्टी आपण खरेदी करत असतो. याच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही बँकांनी त्यांचा व्याजदर कमी केला आहे. याआधी देशातील मोठी बँक एस.बी.आय ने देखील त्यांच्या व्याजदरात कपात केली होती.
बँक ऑफ महाराष्ट्राने रविवारी सणासुदीच्या काळात गृहकर्जावरील व्याजदर आठ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. याआधी बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्जावर 11.35 टक्के व्याजदर देत होती. सध्या ही बँक 8.3 टक्क्यांनी व्याजदर देतं आहे.
तसेच दिवाळी निमित्त बँकेने गृहकर्ज आणि कार कर्जासाठी लागणारे प्रक्रिया शुल्क माफ केलं आहे. हे कर्ज स्वस्त करताना बँकेने आपल्या निवेदनात याचा उल्लेख केला आहे. वाढत्या धोरणात्मक दरांच्या पार्श्वभूमीवर व्याजदर वाढत आहेत.
अशावेळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकाच्या आनंदासाठी सणासुदीच्या काळात किरकोळ कर्ज स्वस्त करण्यात आलं आहे. यापूर्वी ही अनेक बँकानी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कर्ज कमी केलं आहे.