दिवाळीच्या सुट्टीत अनेक लोक गावी आणि पर्यटनासाठी बाहेर जातात. त्यामुळे बऱ्याच रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. आरक्षण फुल्ल झाल्याने रेल्वेच्या प्रतीक्षा यादीत सुद्दा सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आता मध्य, कोकण आणि पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल.
◙ या मार्गावर धावणार विशेष गाड्या
मुंबई- मंगळुरु जंक्शन/मडगाव जंक्शन आणि पुणे – अजनी दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन
१. मुंबई- मंगळुरु जंक्शन साप्ताहिक विशेष
○ 01185 स्पेशल दि. 21.10.2022 ते 11.11.2022 (4 फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22.15 वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 17.05 वाजता पोहोचेल.
○ 01186 स्पेशल दि. 22.10.2022 ते 12.11.2022 (4 फेऱ्या) पर्यंत दर शनिवारी मंगळुरु जंक्शन येथून 18.45 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 11.45 वाजता पोहोचेल.
○ थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बैन्दूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल.
○ संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामधे दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन.
२. मुंबई – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष
◘ 01187 स्पेशल दि. 16.10.2022 ते 13.11.2022 (5 फेऱ्या) पर्यंत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22.15 वाजता सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 12.30 वाजता पोहोचेल.
◘ 01188 स्पेशल दि. 17.10.2022 ते 14.11.2022 (5 फेऱ्या) पर्यंत दर सोमवारी मडगाव जंक्शन येथून 13.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी 23.45 वाजता पोहोचेल.
◘ थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
◘ संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामधे दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन.
३. पुणे जंक्शन – अजनी सुपरफास्ट साप्ताहिक विशेष
• 01189 स्पेशल दि. 18.10.2022 ते 29.11.2022 (7 फेऱ्या) पर्यंत दर मंगळवारी पुणे जंक्शन येथून 15.15 वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी 04.50 वाजता पोहोचेल.
• 01190 स्पेशल दि. 19.10.2022 ते 30.11.2022 (7 फेऱ्या) दर बुधवारी अजनी येथून 19.50 वाजता सुटेल आणि पुणे जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता पोहोचेल.
• थांबे : दौंड कॉर्ड लाईन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
• संरचना : 13 तृतीय वातानुकूलित आणि दोन जनरेटर व्हॅन
टीप : 01185/01186 आणि 01187/01188 स्पेशल गाड्या 30.10.2022 पर्यंत मान्सूनच्या कालावधीतील वेळापत्रकानुसार आणि दि. 6.11.2022 पासून रोहा आणि मंगळुरू जं./मडगाव दरम्यान गैर-मान्सून नसलेल्या वेळापत्रकानुसार चालतील.
आरक्षण : विशेष गाड्या क्र.01185, 01187/01188 आणि 01189/01190 विशेष शुल्कासह बुकिंग दि. 16.10.2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. .
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वेन प्रवाशांना केले आहे.