जम्मू- काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी इम्रान बशीर गनी ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. तो एक हायब्रीड दहशतवादी होता आणि दुस-या दहशतवाद्याच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, त्यादरम्यान दुस-या दहशतवाद्याच्या गोळीने इम्रान ठार झाला.
जम्मू- काश्मीरमधील मजुरांवर ग्रेनेड फेकणारा दहशतवादी इम्रान बशीर गनी याला जिवंत पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याने केलेल्या खुलाशांच्या आधारे छापेमारी करण्यात येत होती. त्यादरम्यान, शोपियानच्या नौगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आणि इम्रान ठार झाला.
जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील दोन मजूर ठार झाले. दोघेही राज्यातील कन्नौज जिल्ह्यातील रहिवासी होते. काश्मीर पोलिसांनी मंगळवारी ट्वीट करत ही माहिती दिली होती.