शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. नुकतीच राष्ट्रवादीचे नेत एकनाथ खडसे आणि संजय राऊतांची जिल्हा सत्र न्यायालयात भेट झाली आहे. या भेटीनंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
माध्यमांशी संवाद साधताना खडसे म्हणाले, जिल्हा न्यायालयाच्या जामीनाच्या सुनावणीनंतर लिफ्टजवळ संजय राऊत आणि माझी भेट झाली. चिंता करू नका सगळं आके आहे. काळजी करू नका. मी लवकरच बाहेर येईन, असंही राऊत म्हणाले असल्याचं खडसेंनी सांगितलं आहे.
खडसे मंगळवारी कामानिमित्त जिल्हा सत्र न्यायालयात गेेले असता, तेथे संजय राऊतांना आणण्यात आले होते. यावेळी दोघांची भेट झाल्याची माहीती समोर आली आहे. आता या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, संजय राऊतांचा कोर्टातला मुक्काम आणखी काही दिवस वाढला आहे. परंतु राऊत मी लवकरच बाहेर येईन, असं म्हणाल्यानं राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे.