महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २००३च्या बॅचच्या अधिकाऱ्यांची केंद्र सरकारने आयपीएस दर्जासाठी निवड केली आहे. डॉ. विनयकुमार राठोड ( पोलीस उपायुक्त, ठाणे), रश्मी करंदीकर (पोलीस अधीक्षक), प्रकाश जाधव (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), श्रीकांत धिवरे ( पोलीस अधीक्षक, सीआयडी पुणे) आणि अश्विनी सानप (पोलीस अधीक्षक, सिक्युरिटी कॉर्पोरेशन) असे आयपीएस दर्जा देण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. एमपीएससीतून उपअधीक्षकपदी नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांना सुमारे दोन दशकांच्या सेवेनंतर त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार आयपीएसचा दर्जा मिळतो. काही महिन्यांसाठी आयपीएस प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना पुढील सेवेत रुजू करण्यात येणार आहे.