यंदाची दिवाळी एस.टी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आणि उत्साहाची ठरणार आहे. या दिवाळीला महाराष्ट्र सरकार एसटी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देणार आहे. यावेळी सगळ्यांना पाच हचार रुपये दिवाळी भेट देणार आहे.
यापूर्वी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीला अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार अशी भेट मिळत होती. यावेळी मात्र अधिकारी आणि एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना 6 टक्के महागाई भत्ता देखील मिळणार आहे.
राज्य शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन 21 ऑक्टोबरला अदा करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे वेतन दिवाळीआधी देण्याची मागणी एसटी महामंडळाकडे केल्याचं महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितलं.
महाराष्ट्र सरकार एसटी कर्मचाऱ्यांना देणार असलेलं गिफ्ट बुधवारपासून एस.टी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतील. मात्र 21 ऑक्टोबरला एसटी कर्मचाऱ्यांना वेतन जमा करण्याचा सध्या कोणता विचार नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.