ठाकरे -शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर असतानाच उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. आता राऊतांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी करण्याची मागणी, बाळासाहेब ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी केली आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या अगदी जवळचे असलेले कुटुंबातील सदस्यांनी म्हणजेच गौरी भिडे आणि अभय भिडे यांनी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पत्नी आणि मुलांची म्हणजेच आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्या संपत्तीची ईडी, सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
कोरोनाच्या काळात लागलेल्या लाॅकडाऊनमध्ये ठाकरेंच्या प्रबोधन प्रकाशनाने 42 कोटींचा टर्नओव्हर केल्याचं दाखवलं आहे. तसेच त्यामधून त्यांना 11.5 कोटींचा फायदा मिळाल्यानं हा पैसा काळा असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
ठाकरे कुटुंबियांनी कधीच आपल्या उत्पन्नाचा मार्ग दाखवला नाही, पण तरीही त्यांच्याकडे मुंबई आणि रायगड यांसारख्या ठिकाणी मालमत्ता आहेत, असंही या याचिकेमध्ये म्हणण्यात आलं आहे.