काही महिन्यांपूर्वी बाॅलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्जप्रकरणी तुरूंगात होता. यावेळी हे प्रकरण चांगलंच चर्चेत होतं. आता पुन्हा या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे.
एनसीबीच्या विशेष पथकानं आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या दिल्लीतील मुख्यालयाला एक अहवाल पाठवला आहे. या अहवालाद्वारे या प्रकरणाचा नीट तपास झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
पुरेसे पुरावे नसतानाही या प्रकरणी चौकशी सुरू होती. तरीही हे प्रकरण पुढं ढकललं जात होतं. तसेच या प्रकरणात 65 जणांचा जवाब 4 वेळा नोंदवण्यात आला आहे. जवाब देणारे व्यक्ती त्यांचे जवाब बदलत होते, अशीही माहिती मिळाली आहे.