Monday, June 24, 2024

वर्षा बंगल्यावर अजित पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट!

maharashtraवर्षा बंगल्यावर अजित पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट!

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी पवारांनी शिंदेंसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच रब्बी पिकांची पेरणी देखील लांबली आहे, म्हणून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळावी, असा आग्रह पवारांनी भेटी दरम्यान शिंदेंकडं केला आहे.

यावेळी पवारांनी पुणे जिल्ह्याच्या प्रश्नावरही शिंदेंसोबत चर्चा केली. पुणे जिल्ह्यात नव्याने सामाविष्ट झालेल्या गावांना लवकर निधी द्यावा, तसेच वडगावशेरी विधासभा मतदारसंघातील पूनर्वसनाच्या मुद्द्यावरही पवारांनी चर्चा केली.

दरम्यान, विकास कामांवरची स्थगिती उठवणे, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प मार्गी लावणे, यांसाख्या अनेक मुद्द्यांवर भेटीदरम्यान पवारांनी शिंदेंचं लक्ष वेधून घेतलं.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles