Tuesday, July 23, 2024

अलिबाग येथील आरसीएफ कंपनीत कंप्रेसरचा स्फोट, ३ ठार

maharashtraअलिबाग येथील आरसीएफ कंपनीत कंप्रेसरचा स्फोट, ३ ठार

रायगड अलिबाग येथील आरसीएफ कंपनीच्या कंट्रोल रूममध्ये कंप्रेसरचा स्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंट्रोल रूममध्ये एअर कंडिशनिंग बसवण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. या अपघातात दिलशाद आलम (29), फैजान शेख (33), अंकित शर्मा (27) यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जखमी आहेत अशी माहिती मिळते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी 4.45च्या सुमारास वातानुकूलित यंत्रणा बसवत असताना, अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरसीएफ कंपनीच्या नियंत्रण कक्षात कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.अतिंद्र, जितेंद्र आणि साजिद सिद्दिकी अशी जखमींची नावे असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खत निर्मिती करणारा केंद्र सरकारचा आरसीएफ प्रकल्प अलिबाग तालुक्यातील थळ येथे आहे. या कंपनीत नवीन एसी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. या स्फोटात एक कंपनी कर्मचारी आणि दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य तीन जण हे गंभीर जखमी झाले आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles