गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुरु असलेल्या 12 व्या डेफएक्स्पो प्रदर्शनातील भारतीय पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 19 ऑक्टोबर 2022 रोजी एचटीटी-40 या स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचे अनावरण केले. या विमानाची संकल्पना आणि विकसन एचएएल अर्थात हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने केले आहे. या प्रसंगी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते