Thursday, March 28, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रात स्वदेशी वापराच्या 101 वस्तूंची चौथी यादी केली जाहीर

maharashtraपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रात स्वदेशी वापराच्या 101 वस्तूंची चौथी यादी केली जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेफएक्सपो 2022 दरम्यान संरक्षण क्षेत्रात स्वदेशी वापराच्या 101 वस्तूंची चौथी यादी केली जाहीर केली संरक्षण मंत्रालयाने उद्योग तसेच सर्व संबंधितांशी केलेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर चौथी यादी तयार केली आहे. यात विकासाच्या प्रक्रियेतील तसेच येत्या पाचदहा वर्षात मागणी नोंदवता येतील अशा उपकरणे/प्रणालींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या तीन याद्यांप्रमाणेच सातत्याने आवश्‍यकता असलेल्या दारूगोळा आयातीला पर्याय निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ही चौथी यादी भारतीय संरक्षण उद्योगाची वाढती क्षमता दर्शवते. तंत्रज्ञान तसेच उत्पादन क्षमतांमध्ये नवीन गुंतवणूक आकर्षित करून देशांतर्गत संशोधन आणि विकासाच्या क्षमतेला ती चालना देणारी आहे.

सशस्त्र दलांचा कल आणि भविष्यातील गरजा समजून घेण्यासाठी तसेच देशांतर्गत आवश्यक संशोधन आणि विकास, उत्पादन क्षमता निर्माण करण्यासाठी देशांतर्गत संरक्षण उत्पादन उद्योगाला पुरेशी स्पष्टता आणि संधी या चौथ्या यादीने निर्माण होणार आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles