Friday, March 29, 2024

देशात सर्वांना लागू होणारे लोकसंख्या धोरण हवे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

maharashtraदेशात सर्वांना लागू होणारे लोकसंख्या धोरण हवे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संघ सरकार्यवाह हे आज प्रयागराज येथील गौहनियामधील जयपुरिया स्कूलच्या वात्सल्य परिसरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.

सरकार्यवाह म्हणाले, की देशातील लोकसंख्येचा विस्फोट चिंताजनक आहे. त्यामुळे या विषयावर समग्रतेने आणि एकात्मतेने विचार करून सर्वांना लागू होणारे लोकसंख्या धोरण आखायला हवे. देशाच्या अनेक भागांमध्ये धर्मांतराचे कारस्थान सुरू आहे. काही सीमावर्ती क्षेत्रांमध्ये घुसखोरीही होत आहे. लोकसंख्येच्या असंतुलनामुळे अनेक देशांमध्ये विभाजनाची वेळ आली आहे. भारताची फाळणीसुद्धा लोकसंख्या असंतुलनामुळेच झाली होती, असेही सरकार्यवाह म्हणाले.

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, की पूर्वी देशभरात संघाच्या 54382 शाखा होत्यास, तर सध्या 61045 शाखा भरत आहेत. साप्ताहिक मिलनातही 4000 आणि मासिक संघ मंडळात गेल्या एका वर्षात 1800 ने वाढ झाली आहे, असे सरकार्यवाह म्हणाले.

लोकसंख्येच्या असंतुलनाशी संबंधित एका प्रश्नाच्या उत्तरात सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, की गेल्या 40-50 वर्षांमध्ये लोकसंख्या नियंत्रणावर भर देण्यात आल्यामुळे प्रत्येक कुटुंबाची सरासरी लोकसंख्या 3.4 पासून कमी होऊन 1.9 एवढी झाली आहे. यामुळे भारतात एक वेळ अशी येईल, की युवकांची संख्या कमी होईल आणि वृद्धांची संख्या अधिक होईल. हे चिंताजनक आहे. देशाला तरुण देश म्हणून कायम ठेवण्यासाठी संख्या संतुलित ठेवण्यावर त्यांनी भर दिला. दुसरीकडे धर्मांतर आणि बाहेरील घुसखोरी यांसारख्या दुष्चक्रामुळे निर्माण होणाऱ्या लोकसंख्या असंतुलनाबाबतही चिंता व्यक्त केली.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles