सध्या देशभर ईडीचं वादळ सुरू आहे. ईडी भाजपच्या नियंत्रणाखाली आहे, अशीही टीका काही राजकीय नेते करत असतात. त्यातच आता रितेश – जेनेलियालाही भाजपने जोर का झटका दिला आहे.
एका भाजप नेत्याने आर्थिक व्यवहार प्रकरणी रितेश-जेनेलियावर गंभीर आरोप केले आहेत. लातूरमधील 16 उद्द्योजकांना सोडून देशमुखांना अवघ्या दहा दिवसांत भूखंड प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपनं देशमुखांवर केला आहे.
तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने त्यांना 116 कोटींचा पुरवठा एवढ्या कमी दिवसांत कसा केला?, असा प्रश्नही भाजपने उपस्थित केला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, बॅंकेने एवढ्या कमी दिवसांत त्यांना कसं काय कर्ज दिलं, तसेच देशमुखांच्या कार्यकर्त्यांनाही या बॅंकेने कर्ज दिलं आहे, असा आरोप करत याची चौकशी वरिष्ट पातळीवरून व्हावी, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे.