Thursday, April 25, 2024

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या निवडणूक चिन्हावरील समता पार्टीची आक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली

maharashtraशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या निवडणूक चिन्हावरील समता पार्टीची आक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिलेले मशाल हे निवडणूक चिन्हावर आक्षेप घेत बिहारमध्ये सक्रीय असलेल्या समता पार्टी या राजकीय पक्षाने कोर्टात धाव घेतली होती. परंतु त्यांची याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना दिलासा मिळाला आहे.

दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 1994 मध्ये समता पार्टीची स्थापना केली. सध्या उदय मंडल समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नितीश कुमार समता पार्टीमधून काही वर्षांपूर्वीच बाहेर पडले आहेत. समता पार्टीने 2014 मध्ये शेवटची लोकसभेची निवडणूक आणि 2020 मध्ये बिहार विधानसभेची शेवटची निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये समता पार्टीचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. यामुळे सध्या विधानसभेत आणि लोकसभेत समता पार्टी अस्तित्वात नाही. पण निवडणूक चिन्ह प्रकरणी आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी सुरू करताच समता पार्टी नव्याने चर्चेत आली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले उद्धव ठाकरे समर्थक आमदार रमेश लटके यांचे निधन झाले. यामुळे रिक्त झालेल्या जागेवर उद्धव ठाकरे गटाने रमेश लटकेंची पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात इतर कोणत्याही पक्षाने आपली उमेदवारी कायम ठेवली नाही यामुळे या मतदार संघातून ऋतुजा रमेश लटकेंचा विजय निश्चित मानला जात आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles