Monday, May 20, 2024

दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर..?

Uncategorizedदिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर..?

शिंदेंचं बंड झालं आणि सगळ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यातीलच एक होत्या शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद ज्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटवण्यचा प्रयत्न केला होता.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या दीपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, दीपाली सय्यद पुन्हा चर्चेत आल्या असून त्या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत बोलताना त्यांनी ‘वेट अ‌ॅण्ड वाॅच’ असं म्हणत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

जेव्हा गरज होती तेव्हा मी बोलले. सतत टीव्ही स्क्रीनवर येऊन तू-तू, मै-मै करणं गरजेचं नाही. बोलण्याइतकंच काम करणंही गरजेचं आहे. ते मी सध्या करतेय, असं त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी शिवसेेनेत प्रवेश केल्यानंतर दीपाली सय्यद या बॅकफूटवर आल्या आहेत. त्यामुळेच की काय पण दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles