Saturday, April 20, 2024

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचा वाद पुन्हा चव्हाट्यावर…

Uncategorizedकरूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचा वाद पुन्हा चव्हाट्यावर...

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सामाजिक कार्यकर्त्या करूणा शर्मा यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. मात्र, करूणा शर्मा यांनी गुरूवारी धनंजय मुंडेंवर एक फेसबुक पोस्ट केली आणि त्यांच्यातील हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला.

करूणा शर्मा यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, माझ्या गाडीत रिव्हाॅल्व्हर ठेवून खोट्या केसमध्ये मला अडकवलं, घाणेरडे व्हिडीओ बनवून माझी गाडी, घर हिसकावलं. जेवढी ताकद लावायची तेवढी लाव. तुझ्या पैशांपुढे झुकली नाही आणि खोट्या ताकदी पुढंही, ही नारी शक्ती आहे.

करूणा शर्मा यांच्या या पोस्टमुळं आता हा वाद नव्याने पेटणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच यावर धनंजय मुंडे काय उत्तर देतील, हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्यासाठी करूणा शर्मा निघाल्या असता, त्यांच्य गाडीत रिव्हाॅल्व्हर सापडलं. तसेच महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आल्याने त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles