ठाकरे आणि राणे कुटुंबातील विळ्या भोपळ्याचं वैर उभा महाराष्ट्र पाहत आला आहे. उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबीयांवर टीका करण्याची एकही संधी राणेंकडून सोडली जात नाही.
राणे आणि ठाकरे घराण्यातील वाद जगजाहीर असताना राणे कुटुंबीय आमच्यासोबत असल्याचा दावा ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणातील कट्टर वैरी खरंच एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
राणे कुटुंबीयांना समजायला हवं की आज नारायण राणे, नितेश राणे किंवा निलेश राणे या कुटुंबीयांना बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद लाभला म्हणून ते मोठे झालेत. मी तर म्हणेन की ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है, असं म्हणत साळवींनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
दरम्यान, मी शिवसेना प्रमुखांशी आणि शिवसेना पक्षाशी किती प्रामाणिक आहे हे राणेंना सांगण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप करणं फार चुकीचं आहे, असंही साळवी नितेश राणेंना उद्देशून म्हणाले.