Saturday, July 27, 2024

नीरव मोदीची संपत्ती जप्त होणार

Uncategorizedनीरव मोदीची संपत्ती जप्त होणार

पंजाब नॅशनल बॅंकेत 13 हजार कोटींची फसवणूक करून हीरा व्यापारी नीरव मोदी हा काही वर्षांपासून फरार आहे. आता याबाबत मुंबई सत्र न्यायालयानं मोठा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीनं जिल्हा सत्र न्यायालयाकडं नीरव मोदी याची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागितली होती. अखेर या न्यायालयानं मोदी याची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी ईडीला दिली आहे.

नीरव मोदीची जवळपास 500 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये अलिबाग बंगल्यातून जप्त करण्यात आलेल्या महागड्या गाड्या आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. तसेच मोदीच्या रिदम हाऊसचा देखील यात समावेश आहे.

दरम्यान, मोदीच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश कर्जवसुली लवादाने यापूर्वीच दिले होते. तसेच त्याच्या HCL हाऊसचा लिलाव करण्याचे आदेशही यापूर्वीच देण्यात आले होते.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles