Friday, November 22, 2024

सरसकट ओला दुष्काळ जाहीर होणार – अब्दुल सत्तार

maharashtraसरसकट ओला दुष्काळ जाहीर होणार - अब्दुल सत्तार

सध्या परतीच्या पावसानं राज्यात थैमान घातलं आहे. या परतीच्या पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यासंदर्भात बुधवारी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती.

पवारांच्या भेटीनंतर शिंदेंनी पिकांचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. नुकतंच यावर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थीती नाही, असं वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे.

परतीचा पाऊस पहिल्यांदाच झाला असं नाही, तो प्रत्येकवर्षी पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही. आमच्याकडं शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती येत आहे. पंचनामे झाल्यावर आकडे कळाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळेल, कोणीही मदतीपासून मुकणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, आतापर्यंत साडेपाच हजार कोटी रूपयांची नुकसान भरपाई दिली असल्याचंही सत्तार यांनी म्हटलं आहे. तसेच दिवाळीच्या तोंडावर बळीराजा नुकसान भरपाईकडे आस लावून बसला आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles