Wednesday, December 4, 2024

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंगल युज प्लास्टिक तपासणी मोहिमा तीव्र करणार

maharashtraकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंगल युज प्लास्टिक तपासणी मोहिमा तीव्र करणार

एकदा वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिकच्या केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या निकषात बसणाऱ्या, अशा प्रकारच्या प्लास्टिकचं उत्पादन, विक्री, साठा आणि वितरण, तसंच या प्लास्टिकची आयात आणि वापर यावर पूर्ण बंदी घालण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं 12 ऑगस्ट 2022 रोजी अधिसूचना जारी केली होती. या वस्तूंमध्ये, कटलरी(कातर,चाकू, सुरी यासारख्या गृहोपयोगी कापण्या साठी वापरली जाणारी उपकरणं किंवा हत्यारं) आवरणासाठी आवश्यक असलेल्या पातळ फिती, आईस्क्रीम-कँडी यात आधार म्हणून वापरले जाणारे कप,चमचे,काड्या, कांड्या यांचा समावेश आहे. ही बंदी 01 जुलै 2022 पासून लागू करण्यात आली आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles